‘राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष’; प्रवीण दरेकरांची जीभ घसरली

‘राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष’; प्रवीण दरेकरांची जीभ घसरली

'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गरीब माणसांकडे बघायला वेळ नाही.कारण राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष आहे' अशा शब्दांत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी 'राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. सुरेखा पुणेकर यांच्या प्रवेशावरुन भाजपाचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसला टोला लगावला आहे.

पुणे जिल्ह्यातील शिरुर येथे आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या 230 व्या जयंती निमित्त जय मल्हार क्रांती संघटनेने घेतलेल्या सोहळ्यात प्रविण दरेकर बोलत होते.'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गरीब माणसांकडे बघायला वेळ नाही.कारण राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष आहे' अशा शब्दांत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षप्रवेशावर जीभ घसरली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com