पुणे हिट अँड रन प्रकरण; अल्पवयीन कार चालकाचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवालला गुन्हे शाखेकडून अटक

अल्पवयीन कार चालकाचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवालला गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आल्याची माहित मिळत आहे.
Published by :
Team Lokshahi

पुण्यातील कल्याणीनगरमध्ये एका बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव वेगाने गाडी चालवत दुचाकीला धडक दिली, त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. यात आता अल्पवयीन कार चालकाचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवालला गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आल्याची माहित मिळत आहे.

गुन्हे शाखेकडून काल रात्री अटक करण्यात आली आहे. हिट अँड रन प्रकरणातील ड्रायव्हरला डांबून ठेवणे आणि त्याला धमकावणे तसेच त्याचा मोबाईल काढून घेतल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com