महाराष्ट्र
बनावट दारूच्या गोदामावर छापा; लाखोंचा मुद्देमाल जप्त
विकास माने, बीड
बीड जवळ बनावट दारू तयार करणाऱ्या गोदामावर राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि बीड ग्रामीण पोलिसांनी छापा मारला आहे. या छाप्यात लाखो रुपयांच्या बनावट दारुसह मशीनरी जप्त करण्यात आली आहे.
बीड शहरा जवळ एमआयडीसी भागातील एका गोदामांमध्ये देशी दारू बनवली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यानुसार या गोदामावर छापा मारत बनावट दारूच्या मशनरीसह लाखोंच्या पुढे मुद्देमाल जप्त करण्यात आला. घटनास्थळी ग्रामीण पोलीस दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.