Rain Alert: राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचे सावट, 'या' जिल्ह्यानां ऑरेंज अलर्ट, शेतकरी चिंतेत

Rain Alert: राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचे सावट, 'या' जिल्ह्यानां ऑरेंज अलर्ट, शेतकरी चिंतेत

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचे संकट कायम आहे. हवामान विभागाने १ आणि २ डिसेंबर रोजी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
Published by :
shweta walge

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचे संकट कायम आहे. हवामान विभागाने १ आणि २ डिसेंबर रोजी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट तर कुठे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

हवामान विभागाने १ डिसेंबर रोजी अमरावती, बुलढाणा, वाशिम आणि अकोला जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यातील बहुतांश भागात पावसाचा यलो अलर्ट असून विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

उत्तर केरळपासून ते मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे सध्या महाराष्ट्रात पाऊस सुरु आहे. ईशान्य अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची परिस्थिती निर्माण झाली आहे. उत्तर महाराष्ट्रावर हवेची चक्राकार परिस्थिती आहे. त्यामुळे पुढील २४ तासांत महाराष्ट्रात पावसाची शक्यता पुणे हवामान विभागाने व्यक्त केली आहे. पुणे शहरातही आज पावसाची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com