मुख्यमंत्री लॉकडाऊनबद्दल निर्णय घेतील, राजेश टोपेंचे सूचक विधान

मुख्यमंत्री लॉकडाऊनबद्दल निर्णय घेतील, राजेश टोपेंचे सूचक विधान

Published by :

राज्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे औरंगाबाद नांदेड, नागपूर , बीड, अमरावती या शहरामध्ये मिनीकोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने लॉकडाउन केले आहे. आता संपूर्ण महाराष्ट्रात देखील लॉकडाऊन लागण्याची चिन्हे दिसत आहेत. २ एप्रिलनंतर दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन लॉकडाउनचा निर्णय घेतली, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात वाढत चाललेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येवर चिंता व्यक्त केली आहे, असं देखील टोपे यावेळी म्हणाले.

'राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात प्रशासनाला निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहे. स्थानिक परिस्थिती आणि सोयीसुविधा पाहून जिल्हे बंद करण्याचा निर्णय तेथील प्रशासनाने घेतला आहे. तर काही ठिकाणी नाईट कर्फ्यु लावला आहे. दरम्यान, काही जिल्ह्यांमध्ये ५ दिवस तर काही ठिकाणी ८ ते १० दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यासाठी ICMR च्या नियमाप्रमाणे किमान १५ दिवसांचा लॉकडाऊन गरजेचा असतो. तरच कोरोनाची साखळी तुटेल. कोरोना रुग्ण बरा होण्याला १५ दिवस लागतात, अशी माहिती देखील राजेश टोपे यांनी दिली आहे.

केंद्राने लसीकरणाची गती वाढवण्याचा चॅलेंज आम्ही स्वीकारतो. मात्र लसीचा पुरवठा देखील वाढवावा लागणार आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त वेगाने लसीकरण सुरू आहे. असं आरोग्यमंत्री टोपे म्हणाले. राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नजर ठेवून आहे. सर्व परिस्थितीचा ते २ एप्रिल रोजी आढावा घेणार आहे. २ तारखेनंतर लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री ठाकरे निर्णय घेतील, असं राजेश टोपे यांनी यावेळी स्पष्टपणे केले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com