गणेश मुर्तीच्या उंचीवर निर्बंध; गोरेगाव प्रवासी संघाने केले स्वागत

गणेश मुर्तीच्या उंचीवर निर्बंध; गोरेगाव प्रवासी संघाने केले स्वागत

Published by :

राज्य सरकारने गणोशोत्सवात गणेश मुर्तीच्या उंचीवर निर्बंध आणले आहेत या निर्बंधामुळे अनेक गणेशभक्त नाखुश असले तरी राज्य सरकारचे गोरेगाव प्रवासी संघाचे अध्यक्ष उदय चितळे यांनी अभिनंदन केले आहे.

गणेश मूर्तीच्या उंचीवर बंधन आणण्याचा निर्णय अनेक वर्षे प्रलंबित राहीला होता.डॉ. शुभा राऊळ या महापौर असताना त्यांनी या विषयाचा पाठपुरावा केला होता.राज्य सरकारने आगामी गणेशोत्सवासाठी अतिशय योग्य अशी नियमावली नुकतीच जाहीर केली. असे उदय चितळे यांनी सांगितले.

"नियमावलीने पर्यावरण प्रेमी सामान्य नागरिक सुखावला आहे. उंच गणेश मूर्ती बनवून काही हजार टन पीओपी समुद्रात ढकलणे हे निषेधार्ह आहे. आता सरकारच्या या निर्णयाला विरोध करत राजकारण करण्याचा प्रकार सुरू केला आहे."

कोरोनाच्या निमित्ताने समुद्रात अनेक गोष्टींचे विसर्जनावर बंदी असल्याने समुद्राचे पाणी व समुद्र किनारे मोठ्या प्रमाणात स्वच्छ झालेले दिसतात. हे सर्व ध्यानात घेत राज्य सरकारने गणेश मूर्तीच्या उंचीवर असलेले बंधन कायम ठेवावे गणेश मंडळांनी या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे व उदर निर्वाहाचा प्रश्न मांडला आहे. गणेशोत्सव मंडळांना मूर्तिकारांकडून चार फुटी शाडूच्या मूर्ती घेऊन मूर्तीच्या किंमतीच्या अनेकपट रक्कम मानधन म्हणून मुर्तिकारांना देऊन त्यांच्या उदरनिर्वाहासाठी मदत करायला काय हरकत आहे?," असा सवाल चितळे यांनी व्यक्त केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com