Rs 2 increase in Amul milk from today
Rs 2 increase in Amul milk from today

AMUL Milk | आजपासून अमूलच्या दुधात 2 रुपयांची वाढ

Published by :
Shweta Chavan-Zagade

देशात दिवसेंदिवस महागाईचा आगडोंब उसळत असतानाच अमूलने दुधाच्या दरात (milk rate) प्रति लिटर २ रुपयांची वाढ केली आहे. अमूल ही डेअरी व्यवसायातील सर्वात मोठी सहकारी संस्था आहे. संपूर्ण देशात अमूलने दरवाढीची घोषणा केली आहे. अमूलने दूध (amul milk) दरात लिटरमागे दोन रुपयांची वाढ केली आहे. ही वाढ आजपासून (1मार्च 2022) राज्यातील खाजगी दूध उत्पादकांकडून करण्यात आले आहे.

गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनचे (GCMMF) अमूल ब्रँड नावाने दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री करत आसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आणि त्यांनी सर्व भारतीय बाजारपेठांमध्ये दुधाचे दर प्रति लीटरमागे 2 रूपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला असल्याने आता अमूल बँड (amul brand) हे ताज्या दुधाची विक्री करता दिसत असून 1मार्च म्हणजे आजपासून ही दरवाढ लागू झाली आहे. तसेच महानंद दुधाचे दर बुधवार 3 मार्चपासून वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अमूल दूधात (amul milk) प्रति लिटर 2 रूपयांनी वाढ झाल्याने एमआरपी हा 4 टक्क्यांनी वाढला असून त्याची सरासरी ही अन्न महागाईपुढे कमी आसल्याचे त्यांनी आपल्या अमूल दुधसंघाच्या निवेदनात लिहिले आहे. अमूलने मागील 2 वर्षांपासून त्यांच्या ताज्या दुधाच्या श्रेणीमध्ये दर वर्षीप्रमाणे फक्त 4 टक्क्यांनी वाढ केली असल्याचे स्पष्ट केले. ही दरवाढ ऊर्जा, पॅकेजिंग, लॉजिस्टिक्स, पशुखाद्याच्या खर्चात वाढ झाली असल्याने करण्यात आले असे महामंडळाने सांगितले. तसेच खर्चामध्ये झालेली वाढ पाहता त्यांनी शेतकऱ्यांच्या किमतीत 35 ते 40 रूपये प्रति किलो फॅकची वाढ केली, आणि मागच्या वर्षाच्या तुलनेत 5 टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचे सदस्य संघटनांनी स्पष्ट केले असून असेही अमूलने नमूद केले. दूध ही सर्वसामान्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com