समीर वानखडे प्रकरणाची SIT मार्फत चौकशी व्हावी – नवाब मलीक

समीर वानखडे प्रकरणाची SIT मार्फत चौकशी व्हावी – नवाब मलीक

Published by :

मुंबई क्रुझ ड्रग्स आणि आर्यन खान प्रकरणात अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे समीर वानखडे यांची SIT मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेतल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

"मी दोन दिवस परभणी आणि नांदेडच्या दौऱ्यावर असताना, ज्या काही घडामोडी या क्रुझ ड्रग्ज केसमध्ये झालेल्या आहेत. एका पंचाने प्रतिज्ञापत्राच्या माध्यामातून जो सगळा प्रकार समोर आणलेला आहे, हे धक्कादायक आहे. मी जे आरोप करत होतो, त्यात कुठं तरी भर देणारा हा प्रकार आहे. ज्याप्रकारे मी अगोदरच जाहीर केलं होतं की, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मुख्यमंत्र्यांना मी भेटणार आहे. आज दोघांना भेटून या प्रकरणी एसआयटी चौकशीच्याबाबत मी त्यांच्याशी बोललो. गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की या प्रकरणात बऱ्याच लोकांनी तक्रारी केल्या आहेत. पोलीस विभाग त्याचा तपास करत आहे. तपास करून निश्चितरूपाने यामध्ये गुन्हा दाखल करून त्यावर कारवाई होईल, असं मला आश्वासन देण्यात आलेलं आहे," असं मलिक म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com