Sharad Pawar : आजचा दिवस आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये अखंड राहील

Sharad Pawar : आजचा दिवस आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये अखंड राहील

शरद पवार गटाला तुतारी चिन्ह बहाल करण्यात आले.
Published by :
Siddhi Naringrekar

शरद पवार गटाला तुतारी चिन्ह बहाल करण्यात आले. शरद पवार यांच्या पक्षाला आता नवे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला हे चिन्ह देण्यात आले.

याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या तुतारी पक्ष चिन्हाचं रायगडावर अनावरण करण्यात आले. पक्ष चिन्ह अनावरण सोहळ्यासाठी सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांसह महत्त्वाचे नेते उपस्थित होते.

यावेळी शरद पवार म्हणाले की, आजचा दिवस आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये अखंड राहील. आज आठवणीत राहिल असा दिवस. सध्या राज्यात अडचणी वाढतील अशी स्थिती. जनतेसाठी ही आनंदाची तुतारी असेल. जनतेचं राज्य आणावं लागेल. राज्याची स्थिती बदलण्यासाठी जनतेचं राज्य आणावं लागेल. संघर्षाची सुरुवात करण्याकरता प्रेरणा देणारी ही तुतारी आहे. असे शरद पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com