एखाद्या घटनेबद्दल संवेदना व्यक्त करायला हव्यात; पवारांचा अप्रत्यक्षपणे मोदींना टोला

एखाद्या घटनेबद्दल संवेदना व्यक्त करायला हव्यात; पवारांचा अप्रत्यक्षपणे मोदींना टोला

Published by :

रूपेश होले, बारामती | उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी दुर्घटनेवरून देशभरातून संताप व्यक्त होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात एक चकार शब्द देखील काढला नाही. या प्रकरणावरच आता नेते शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता टीका केली आहे.

कुणीही संवेदनशील व्यक्ती असेल तर त्यांनी एखाद्या घटनेबद्दल संवेदना व्यक्त करायला हव्यात.. मी कुणाचं नाव घेणार नाही.. पण या बाबीची आवश्यकता आहे, असे विधान करत पवारांनी नाव न घेता मोदींना टोला हाणलाय.
उत्तरप्रदेशात शेतकऱ्यांच्या अंगावर वाहन घालण्यात आले. त्याची तुलना मी जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली. त्याचा संताप किंवा राग सत्ताधाऱ्यांना आला असावा, आजची कारवाई ही त्यावरील प्रतिक्रिया असावी, अशी शक्यता नाकारता येत नाही,अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गुरुवारी आयकर विभागाने केलेल्या छापेमारीबाबत नाराजी व्यक्त केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com