शिवसेना नेत्याच्याच कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

शिवसेना नेत्याच्याच कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

Published by :

समीर महाडेश्वर | एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना नियमांचे पालन करण्याचे जनतेला आवाहन करत असताना दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सेना नेत्यांकडून कोरोना नियमांची पायमल्ली होत असल्याची प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर आता नियम फक्त सर्वसामान्यांनाचं आहेत का ? आयोजकांवर कारवाई होणार का ? असा सवाल यानिमित्त उपस्थित होत आहे.

कणकवलीचे माजी नगराध्यक्ष आणि शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक, अरूण दुधवडकर सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख उपस्थित होते. यासह तब्बल शेकडोच्यावर कार्यकर्ते उपस्थित होते. सोशल डीस्टन्सचा पुरता बोजवारा उडालेला आहे पहायला मिळत आहे. लोकप्रतिनिधीचं कोरोना नियमांचे उल्लंघन करत असल्याचे दिसत आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा सध्या चौथ्या स्थरात असून, कोरोना रूग्णांमधे वाढ होत आहे अशा परिस्थितीत जिल्ह्याचे पालकमंत्रीच अशा गर्दीच्या कार्यक्रमांना उपस्थित राहत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केल जात आहे. तसेच लोकप्रतिनिधीसाठी कोरोनाची वेगळी नियमावली आहे का ? नियम फक्त सर्वसामान्यांनाचं आहेत का ? आयोजकांवर कारवाई होणार का ? असा सवाल यानिमित्त उपस्थित होत असून आता कारवाई होणार का याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com