Hingoli : Santosh Bangar : शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान गोपनीयतेचा भंग
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Hingoli) नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या 264 अध्यक्षपदांच्या आणि 6 हजार 42 सदस्यपदांच्या जागांसाठी आज मतदान होईल. मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आज मतदान पार पडल्यानंतर उद्या 3 डिसेंबरला मत मोजणी होणार आहे.आज नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या 264 अध्यक्षपदांच्या आणि 6 हजार 42 सदस्यपदांच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार, मतदार कोणाला कौल देणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान गोपनीयतेचा भंग करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. हिंगोलीत शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी आपला मतदानाचा हक्क बजावताना मतदान गोपनीयतेचा भंग केल्याची घटना घडली आहे
आपला मतदानाचा हक्क बजावताना महिलेला मतदान कुठे करायचे असे सांगत मतदान गोपनीतेचा भंग केला आहे. यावर भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी बांगर यांच्यावर गंभीर टीका केली आहे. संतोष बांगर हे लोकशाहीला कलंक असून त्यांनी लोकशाहीचा भंग केला आहे. आम्ही निवडणूक विभागाकडे तक्रार केल्याची माहिती भाजपा आमदार तानाजी मुटकुळे यांनी दिली आहे.
Summery
हिंगोलीत शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला
शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान गोपनीयतेचा भंग
संतोष बांगर हे लोकशाहीला कलंक भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांची टीका
