Sports Education
Sports Education

Dhananjay Mahadik: देशातील सर्व खासगी आणि सरकारी शाळांमध्ये क्रीडा शिक्षण अनिवार्य होणार, खासदार धनंजय महाडिकांकडून संसदेत विधेयक सादर

Sports Education: खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेत सादर केलेल्या विधेयकानुसार देशातील सर्व खासगी आणि सरकारी शाळांमध्ये क्रीडा शिक्षण अनिवार्य होणार आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

नवी दिल्लीतील संसदेच्या हिवाळी अधिवेशनात खासदार धनंजय महाडिक यांनी एक महत्त्वाचे विधेयक सादर केले आहे, ज्यामुळे देशातील प्रत्येक खासगी आणि सरकारी शाळांमध्ये प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरावर क्रीडा शिक्षण अनिवार्य होणार आहे. या विधेयकानुसार प्रत्येक शाळेमध्ये खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहन देणाऱ्या मूलभूत पायाभूत सुविधांचा समावेश करणे ही अत्यंत गरजेची बाब होणार आहे.

Sports Education
Mumbai Weather: मुंबईत गुलाबी थंडीची चाहूल! वाढत्या वायू प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम

विशेषतः देशातील शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या आरोग्याच्या संवर्धनासाठी हे पाऊल महत्वाचे मानले जात आहे. क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी मैदान, आवश्यक खेळ सामग्री, प्रशिक्षक आणि इतर सुविधा उपलब्ध करणे या विषयांवरही या विधेयकात भर देण्यात आला आहे. या नव्या नियमांमुळे लहान मुलांपासून तरुणांपर्यंत खेळातील समृद्धी वाढेल आणि शालेय स्तरावर खेळाडूंची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढेची शक्यता आहे.

Sports Education
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या बोगस लाभार्थ्यांकडून राज्य शासनाची फसवणूक, सरकारचे तब्बल 'एवढ्या' कोटी रुपयांचे नुकसान

खासदार धनंजय महाडिक यांच्या म्हणण्यानुसार, या विधेयकामुळे देशभरातून नव्याने अनेक क्रीडापटू तयार होऊन भारताचा आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात दबदबा अधिक मजबूत होऊ शकतो. तसेच, विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक विकास होईल आणि हा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी मोठा टप्पा ठरणार आहे. या विधेयकाच्या पक्षात अनेक मान्यवर आणि शिक्षणतज्ज्ञांनीही अभिप्राय दिला असून, त्याच्या अंमलबजावणीसाठी सरकारने लवकरच आवश्यक उपाययोजना करण्याचा इरादा व्यक्त केला आहे.

यामुळे शिक्षण क्षेत्रात क्रीडा शिक्षणाला नव्या उंचीवर नेण्याचा मानस असून, आगामी काळात शालेय विद्यार्थ्यांमध्ये खेळाचे महत्त्व अधिक वाढेल, असा विश्वास वर्ल्ड क्रिकेट, हॉकी, आणि अन्य खेळाच्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com