राज्य सरकारकडून बकरी ईदसाठी नियमावली जाहीर

राज्य सरकारकडून बकरी ईदसाठी नियमावली जाहीर

Published by :

कोरोनामुळे संकटामुळे राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यामुळे बकरी ईदनिमित्त राज्य सरकारकडून नियमावली जारी करण्यात आली आहे.यंदाची बकरी ईद साधेपणानं साजरी करण्याचं आवाहन करण्यात आलंय.तर ईदनिमित्त सध्या लागू असलेल्या निर्बंधांमध्ये कसलीही शिथिलता देण्यात आलेली नाही. ईद साजरी करताना लागू करण्यात आलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल. दरम्यान, सणाचा प्रत्यक्ष दिवस येईपर्यंत यात काही अधिक सूचनांची भर पडल्यास त्याचेही पालन करण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आलंय.

बकरी ईदसाठी नियमावली पुढील प्रमाणे
सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये.
मशिद किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी अदा न करू नये.
नागरिकांनी घराच्या घरी नमाज पठण करावे.
ऑनलाईन किंवा दुरध्वनीद्वारे जनावरं खरेदी करावी.
नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी द्यावी.
सध्या लागू असलेल्या निर्बंधामध्ये बकरी ईद निमित्ताने कोणतीही शिथिलता देण्यात येणार नाही.
बकरी ईद निमित्त सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये.
ईद साजरी करताना लागू करण्यात आलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल. दरम्यान, सणाचा प्रत्यक्ष दिवस येईपर्यंत यात काही अधिक सूचनांची भर पडल्यास त्याचेही पालन करण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com