राज्यात लॉकडाउन लागणार का? आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले…

राज्यात लॉकडाउन लागणार का? आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले…

राज्यात मागील काही दिवसांपासून करोना संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागला आहे. शिवाय, ओमायक्रॉनच्या रूग्ण संख्येतही वाढ सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारकडून कठोर निर्बंध लावण्याच्या हालाचाली सुरू झाल्या आहेत. आता राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउन लागणार का? असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाला आहे. या संदर्भात आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली.

आम्ही अगोदर देखील म्हणालो आहोत, लॉकडाउन… लॉकडाउन… असं जरी कोणी म्हणत असेल तरी तो आत्ता नाहीच. सध्या अजिबात तो विषय नाही. कारण, काल मुख्यमंत्र्यांच्या प्रदीर्घ अशा आरोग्य विभाग व टास्क फोर्स सोबत झालेल्या बैठकीत लॉकडाउनची कुठेही चर्चा नाही. निर्बंध जरूर वाढवले पाहिजे आणि लॉकडाउनची भाषा आम्ही त्याचवेळी केली की, ज्यावेळी ७०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा वापर होईल, त्या दिवशी ऑटोमोडमध्ये लॉकडाउन होऊन जाईल. अशा पद्धतीने ठरवण्यात आलेलं आहे. त्यामुळे आज इतक्या लवकर लॉकडाउनचा काही विषय नाही. नक्कीच संख्या वाढतेय हे मात्र तेवढच खरं आहे".

"लॉकडाउनचा परिणाम हा थेट अर्थकारणावर होतो. गरीब माणूस, हातावर पोट असणाऱ्यावर होतो. लोकांनी पहिल्या दुसऱ्या लॉकडाउनची झळ सोसलेली आहे. निर्बंधांच्या बाबतीत नक्कीच कठोर कार्यवाही करण्याच काम सुरू झालेलं आहे. बेड्सची उपलब्धता आणि ऑक्सिजनचा वापर या दोन गोष्टींवरून पुढील निर्णय घेतले जातील." असंही टोपेंनी यावेळी सांगितलं.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com