पंधराव्या वित्त आयोगाची तरतूद; राज्याला १, ४५६ कोटींचा निधी

पंधराव्या वित्त आयोगाची तरतूद; राज्याला १, ४५६ कोटींचा निधी

Published by :

लोकशाही न्यूज नेटवर्क

केंद्राकडून राज्याला १ हजार ४५६ कोटींचा निधी मिळाल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. पंधराव्या वित्त आयोगाकडून संबंधित रक्कम प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे ग्रामंपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांसाठी अतिरिक्त निधी उपलब्ध झाला आहे. सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांना अनुक्रमे ८०:१०:१० प्रमाणे निधी वितरीत करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे.

यामध्ये २०२०-२१ वर्षासाठी एकूण ५ हजार ८२७ कोटी निधीची तरतुद आहे. यापूर्वी २ हजार ९१३ कोटी ५० लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. हा हफ्त्याचा पहिला टप्पा होता. हा निधी जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींसाठी खर्च करण्यासाठी या आधीच वितरीत करण्यात आला होता. पंधराव्या वित्त आयोगातून आतापर्यंत ४ हजार ३७० कोटी २५ लाख रुपये निधी प्राप्त झाल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

या योजनेतून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी निधीचा वापर करत चांगल्या विकासकामांची निर्मिती करावी, असे आवाहन मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. विशेष म्हणजे या निधीतील ८० टक्के भाग थेट ग्रामपंचायतींना विकासकामांसाठी मिळणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींचा थेट सहभाग यामध्ये वाढणार आहे. उर्वरित निधीपैकी १० टक्के निधी जिल्हा परिषद तर अन्य १० टक्के निधी पंचायत समित्यांना मिळणार असल्याची माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com