Washim : इस्त्रोच्या देदीप्यमान कार्याला सलामी देण्यासाठी विद्यार्थ्यांनी साकारली इस्त्रोची प्रतिकृती

Washim : इस्त्रोच्या देदीप्यमान कार्याला सलामी देण्यासाठी विद्यार्थ्यांनी साकारली इस्त्रोची प्रतिकृती

आज चांद्रयान ३ मोहीमेचे लॅंडींग होणार, यावेळी विद्यार्थ्यांनी हॅपी फेसेस द कांसेप्ट स्कूलच्या विद्यार्थांनी शाळेच्या मैदानावर एकत्र येत या ऐतिहासिक दिवसाचा आनंद साजरा केला.
Published by  :
Team Lokshahi

गोपाळ व्यास|वाशिम: आज चांद्रयान ३ मोहीमेचे लॅंडींग होणार असून त्या पार्श्वभूमीवर भारतीय अंतराळ संस्था इस्त्रोच्या देदीप्यमान कार्याला सलामी देण्यासाठी वाशीम येथील हॅपी फेसेस द कांसेप्ट स्कूलमध्ये तब्बल १५०० विद्यार्थ्यांनी इस्त्रोची प्रतिकृती साकारली आहे.

यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेच्या मैदानावर एकत्र येत या ऐतिहासिक दिवसाचा आनंद साजरा केला. शाळेचे संचालक दिलीप हेडा, कविता हेडा आणि शाळेचे प्राचार्य प्रवीण नसकरी यांच्या उपस्थितीतीमध्ये विद्यार्थ्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम्,जय जवान जय किसान आदी देशभक्तिपर घोषणांनी शालेय परिसर निनादुन सोडला.

देशाच्या या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार विद्यार्थ्यांनी सुद्धा व्हावे यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले असून विद्यार्थ्यांनी त्या त्या माध्यमातून चांद्रयान मोहिमेचे लॅंडींग पाहावे असे आवाहन संचालक दिलीप हेडा यांनी विद्यार्थ्यांना केले.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com