विद्यापीठ प्रशासनाच्या दडपशाही विरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक

विद्यापीठ प्रशासनाच्या दडपशाही विरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक

शस्त्र दाखवून विद्यार्थ्यांना धमकविणाऱ्या विरोधात कारवाई करावी या मागणीसाठी कुलगुरूंना भेटावयास गेलेल्या विद्यार्थी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
Published by :
Dhanshree Shintre

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दि.14 फेब्रुवारी रोजी बजरंग दलाच्या 40-50 जणांच्या टोळक्याने भगवे फडके बांधून लाठ्या-काठ्या, शस्त्र दाखवून विद्यार्थ्यांना धमकविणाऱ्या विरोधात कारवाई करावी या मागणीसाठी कुलगुरूंना भेटावयास गेलेल्या विद्यार्थी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. गुन्हे दाखल केल्याप्रकरणी नाराजी व्यक्त करणाऱ्या अधिसभा सदस्यांना अपात्र करण्यासाठी बजावलेल्या कारणे दाखवा नोटीस हे नवीन कुलगुरू डॉ विजय फुलारी, प्र. कुलसचिव प्रशांत अमृतकर यांनी लादलेली दडपशाही असून या विरोधात आता विद्यार्थी कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून या विरोधात दि.27 फेब्रुवारी रोजी आंदोलन करण्याचे आज पार पडलेल्या बैठकीत एकमताने ठरविण्यात आले.

बजरंग दलाच्या टोळीला पाठीशी घालण्यासाठी खाजगी सुरक्षा राक्षकांमार्फत तक्रार देऊन विद्यापीठ प्रशासन कुणाला पाठीशी घालत आहे. कारवाईबाबत जाब विचारणाऱ्या विद्यार्थ्यांवर कुलसचिव अमृतकर यांनी संशोधक विद्यार्थ्यांना पैसे मागितल्या प्रकरणी आंदोलन केल्याचा राग मनात ठेवून जाणीवपूर्वक कुलसचिव पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून गुन्हे दाखल केले असा आरोप सर्वांनी केला आहे. कुलगुरू फुलारी हे हुकूमशहाप्रमाणे वागत असून ही हुकूमशाही मोडून काढण्याचा यावेळी निर्धार करण्यात आला.

अमृतकर यांनी संशोधक विद्यार्थी वाघमारे यांच्या कडून पैसे मागितल्या प्रकरणी विभागीय चौकशी गठीत करून कुलसचिव पदावरून हटविण्यात यावे, विद्यार्थ्यांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी हाय रिझोलुशन कॅमेरे बसविण्यात यावे, विद्यापीठाला सुरक्षा भिंत उभारण्यात यावी, विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे वसतिगृह उभारण्यासाठी यशवन्त मुलांचे वसतिगृहासाठी नियमबाह्य पणे अधिग्रहित केलेली जमीन ताब्यात घ्यावी,असक्षम सुरक्षा अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात यावी आदी मागण्या या आंदोलनातून करण्यात येणार असून तत्पूर्वी शनिवारी दि.24 रोजी वाय पॉईंट येथे पुन्हा एक व्यापक बैठक घेण्यात येणार आहे.

यावेळी प्रा.देवानंद वानखेडे, सचिन निकम, गुणरत्न सोनवणे, लोकेश कांबळे, राहुल वडमारे, एड अतुल कांबळे, दिक्षा पवार, जयश्री शिर्के, प्रकाश इंगळे, विकास रोडे, राष्ट्रपाल गवई, कुणाल राऊत, नरेश वरठे, सिद्धार्थ शिंगारे, प्रतीक बोर्डे, अमरदीप अवचार, जयेश पठाडे, बॉबी गवळी, धम्मा धनवे, विश्वजित गायकवाड, अमरदीप हिवराळे, रत्नदीप अविनाश कांबळे, भीमराव वाघमारे, सिद्धार्थ मोरे, निलेश वाघमारे, राहुल मकासरे, सिद्धार्थ पाणबुडे, प्रा.गजहंस, प्रा.बैसाने, सचिन खंदारे, डॉ.प्रेमराज वाघमारे, डॉ.राहुल तायडे, गोलू गवई, अजय गायकवाड, आकाश पंडित, डॉ.अंभोरे, विजय बचके, एड शाहिद शेख, अनिकेत प्रधान, कुणाल झालटे, सुमेध नरवडे, मंथन गजहंस, रोहन नेतने आदींसह मोठ्या संख्येने विद्यार्थी प्राध्यापक उपस्थित होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com