उपविभागीय अधिकारी सोहम वायाळ यांनी  मतदान केंद्रांना भेट देत केली तपासणी

उपविभागीय अधिकारी सोहम वायाळ यांनी मतदान केंद्रांना भेट देत केली तपासणी

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पैठण उपविभागीय अधिकारी सोहम वायाळ यांनी पैठण तालुक्यातील बिडकिन आणि परिसरातील मतदान केंद्रांना भेट देऊन तपासणी केली.
Published by :
Team Lokshahi

सुरेश वायभट, पैठण; लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पैठण उपविभागीय अधिकारी सोहम वायाळ यांनी पैठण तालुक्यातील बिडकिन आणि परिसरातील मतदान केंद्रांना भेट देऊन तपासणी केली.

जिल्हा परिषद शाळेत मतदार नोंदणी अधिकारी यांची बैठक घेऊन मतदान केंद्रावर उपलब्ध सुविधांबाबत आढावा घेतला होता. ज्या सोई सुविधा ,दुरुस्ती उपलब्ध होत नाही, ते लवकर पुर्ण करण्याच्या सूचना वायाळ यांनी मुख्याधपकांना दिले.

suresh vaybhat

शाळेत खिचडी वाटप होत असताना खिचडीच्या गुणवत्तेची तपासणी केली. त्यासोबतच बिडकिन येथील सरस्वती भुवन विद्यालय येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि विद्यार्थांना मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षकासह विद्यार्थांची उपस्थिती होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com