अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरण; सुप्रिया सुळे म्हणाल्या...

अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरण; सुप्रिया सुळे म्हणाल्या...

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला.
Published by :
Siddhi Naringrekar

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यांना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण या गोळीबारात अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला आहे. घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणारा मॉरिस याने स्वत:ला देखील गोळ्या झाडल्या. मॉरिसने आधी त्याच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर फेसबुक लाईव्ह केलं. त्यांनी समाजासाठी आम्ही एकत्र आल्याचं म्हटलं. अभिषेक घोसाळकर यांचं बोलणं संपवून उठत असताना त्यांच्यावर अचानक गोळ्या झाडण्यात आल्या. गोळ्या झाडल्यानंतर मॉरिसनंही स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या.

यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मुंबईतील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची सोशल मिडियावर लाईव्ह असताना गोळीबार करुन हत्या करण्यात आली.नेत्यांवर गोळीबार होण्याची ही महिन्यातील दुसरी वेळ. एकीकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राजरोसपणे गुंडांना भेटत असून त्यांना राजाश्रय मिळत असल्याचे समोर येत आहे.

तर दुसरीकडे अशा पद्धतीने गोळीबाराच्या घटना घडत आहेत. या राज्यात भाजपा आमदार गणपत गायकवाड म्हणाले त्याप्रमाणे अधिकृतपणे 'गुंडाराज' सुरु झाले आहे का? नेत्यांचे दिवसाढवळ्या खुन पडत आहेत. याचाच अर्थ राज्याच्या गृहमंत्री महोदयांचे त्यांच्या स्वतःच्या खात्याकडे अजिबात लक्ष नाही. त्यांच्या या दुर्लक्षामुळे कायदा सुव्यवस्था पुर्णतः ढासळली आहे. गृहमंत्र्यांच्या नाकर्तेपणाची किंमत सर्वसामान्य जनतेने का चुकवावी? असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com