Tanaji Sawant : आमचा महायुतीचा उमेदवार 2 लाख मतांनी निवडणूक येणार

Tanaji Sawant : आमचा महायुतीचा उमेदवार 2 लाख मतांनी निवडणूक येणार

तानाजी सावंत यांनी धाराशिव येथे मोदींच्या होणाऱ्या सभा स्थळाची पाहणी केली.
Published by :
Siddhi Naringrekar

तानाजी सावंत यांनी धाराशिव येथे मोदींच्या होणाऱ्या सभा स्थळाची पाहणी केली. यावेळी माध्यमांशी बोलताना तानाजी सावंत म्हणाले की, 7 मेला दिसेल माझा उमेदवार मतपेटीत ज्या वेळेस मतदान बंद होईल 4 जूनला या मतपेट्या उघडल्या जातील त्यावेळेस आमचा हा महायुतीचा उमेदवार घडाळ्यापुढचं चिन्ह दाबून 2 लाख मतांनी विजयी झालेला तुम्हाला दिसेल.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, 5वेळा पंतप्रधान साहेब सोलापूरला येऊन गेले. मला वाटतं ते सोलापूर जिल्ह्याचे किंवा शहराचे हे भाग्य आहे. आज धाराशिव शहरामध्ये कित्येक वर्षाने पहिल्यांदाच पंतप्रधान साहेबांची सभा या ठिकाणी होत आहे.

आज आमच्या हक्काचं 22 टीएमसी पाणी आणून सुजलाम सुफलाम करायचा हा एकच हेतू आणि एकच मागणं आमचे विश्वनेते पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्याकडे साकडे असेल. असे तानाजी सावंत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com