Maharashtra Weather
Maharashtra Weather

Maharashtra Weather : महाराष्ट्र गारठला! 'या' भागात पुढील काही दिवस गारठा कायम राहण्याची शक्यता

राज्यात थंडीचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

( Maharashtra Weather ) राज्यात थंडीचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे. किमान तापमानात घट असल्याने गारठ्याचे प्रमाण अधिक असून मागील काही दिवसांपासून राज्यात गारठा कायम आहे. पुढील दोन - तीन दिवस मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि विदर्भात थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

थंडीची लाट पुढील दोन तीन दिवस कायम असल्याने गारठ्याचे प्रमाण सर्वाधिक राहील. उत्तर भारतातून थंड हवेचे प्रवाह वाढल्याने राज्यात थंडीचे प्रमाण वाढले आहे. धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट परिसर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, अमरावती, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या भागात पुढील काही दिवस गारठा कायम राहण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात सोमवारी 22.2 अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात 18.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

Summery

  • राज्यात थंडीचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता

  • थंडीची लाट पुढील दोन तीन दिवस कायम असल्याने गारठ्याचे प्रमाण सर्वाधिक राहील

  • उत्तर भारतातून थंड हवेचे प्रवाह वाढल्याने राज्यात थंडीचे प्रमाण वाढले

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com