Tuberculosis: राज्यात एक महिना पुरेल इतकाच क्षयरोग औषधांचा साठा

Tuberculosis: राज्यात एक महिना पुरेल इतकाच क्षयरोग औषधांचा साठा

औषधे स्थानिक पातळीवर उपलब्ध होत नसल्याने राज्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
Published by :
Dhanshree Shintre

राज्यात एक महिना पुरेल इतकाच क्षयरोग औषधांचा साठा आहे. ही बाब लक्षात घेत आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने देशातील सर्व राज्यांना स्थानिक पातळीवर औषधे खरेदी करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे असले तरी ही औषधे स्थानिक पातळीवर उपलब्ध होत नसल्याने राज्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. मागील काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रासह देशामध्ये क्षयरोगावरील औषधांचा तुटवडा निर्माण झाला होता. ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने तातडीने क्षयरोगावरील औषधे खरेदीची प्रक्रिया सुरू केली.

मात्र, आजही फोर-एफडीसी आणि थ्री-एफडीसी या प्रकारातील औषधांचा साठा एक महिनाच पुरेल इतकाच उपलब्ध आहे. ही औषधे मार्च किंवा एप्रिल अखेरपर्यंत पुरेल इतकाच साठा असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध झाला नाही, तर केंद्र सरकारच्या ‘क्षयरोगमुक्त भारत’ योजनेला खीळ बसण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, ओडिशा, बिहार, छत्तीसगड या राज्यांसह संपूर्ण देशामध्ये काही महिन्यांपूर्वी क्षयरोगाच्या औषधांचा तुटवडा निर्माण झाला होता. यासंदर्भात देशातील क्षयरोगविरोधी काम करणाऱ्या संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवला होता. त्याची दखल घेत केंद्र सरकारने ‘क्षयरोग मुक्त भारत’ हे अभियान अधिक सक्षमपणे राबविता यावे, यासाठी तातडीने क्षयरोगविरोधी औषधांची खरेदी करण्यास सुरुवात केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com