जलसंकट? कोयना धरणात केवळ 'इतकाच' पाणीसाठा शिल्लक

जलसंकट? कोयना धरणात केवळ 'इतकाच' पाणीसाठा शिल्लक

कोयना धरणांतर्गत विभागात अद्यापही पाऊस पडत नसल्याने धरणातील पाणीसाठा अधिकाधिक खालावत चालला आहे.

निसार शेख | चिपळूण : कोयना धरणांतर्गत विभागात अद्यापही पाऊस पडत नसल्याने धरणातील पाणीसाठा अधिकाधिक खालावत चालला आहे. कोयना चौथ्या टप्प्यातील वीजनिर्मिती बंद ठेवली असून पूर्वेकडे सिंचनासाठी व पोफळी, अलोरे जलविद्युत प्रकल्पांसाठी अत्यल्प पाणी सोडण्यात येत आहे. धरणात सध्या उपयुक्त केवळ ६.०३ टीएमसी इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. १०५.२५ टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या कोयना धरणात सध्या ११.०३ टीएमसी म्हणजेच एकूण क्षमतेच्या १०.०३ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यापैकी उपयुक्त साठा अवघा ६.०३ टीएमसी आहे.

जलसंकट? कोयना धरणात केवळ 'इतकाच' पाणीसाठा शिल्लक
वेदांता फॉक्सकॉन घालवला आता 'तो' प्रकल्प तरी...; पटोलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

धरणातील पाण्यावर पश्चिमेकडे पोफळी, अलोरे व कोयना चौथा टप्पा या तीन टप्प्यातून १९२० मेगावॅट वीजनिर्मिती केली जाते. पाण्याअभावी तसेच राज्यातील अन्य प्रकल्पातून उपलब्ध होत असलेल्या वीजेमुळे कोयनेतून अपेक्षित मागणी नसल्याने चौथ्या टप्प्यातील वीजनिर्मिती बंद ठेवली आहे. सध्याची जलपातळी ६१८.६९६ मीटर इतकी आहे. धरणात अपेक्षित पाऊस व पाणीसाठा झाल्यानंतरच चौथ्या टप्प्यातून वीजनिर्मिती पुन्हा सुरू करण्यात येईल. अद्यापही कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या पोफळी व अलोरे जलविद्युत प्रकल्पातून अपेक्षित व मागणीनुसार टप्प्याटप्प्याने वीजनिर्मिती सुरू आहे.

धरणाची एकूणच धरणातील पाण्यावर पश्चिमेकडे पोफळी, अलोरे व कोयना चौथा टप्पा या तीन टप्प्यातून १९२० मेगावॅट वीजनिर्मिती केली जाते. पाण्याअभावी तसेच राज्यातील अन्य प्रकल्पातून उपलब्ध होत असलेल्या वीजेमुळे कोयनेतून अपेक्षित मागणी नसल्याने चौथ्या टप्प्यातील वीजनिर्मिती बंद ठेवली आहे. सध्याची जलपातळी ६१८.६९६ मीटर इतकी आहे. धरणात अपेक्षित पाऊस व पाणीसाठा झाल्यानंतरच चौथ्या टप्प्यातून वीजनिर्मिती पुन्हा सुरू करण्यात येईल. अद्यापही कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या पोफळी व अलोरे जलविद्युत प्रकल्पातून अपेक्षित व मागणीनुसार टप्प्याटप्प्याने वीजनिर्मिती सुरू आहे. धरणाची एकूणच पाणी साठवण क्षमता खालावत असल्याने चिंता वाढली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com