ठाण्यात ज्यू धर्माचं प्रार्थना स्थळ बॉम्बद्वारे उडवण्याची धमकी

ठाण्यात ज्यू धर्माचं प्रार्थना स्थळ बॉम्बद्वारे उडवण्याची धमकी

ठाण्यात ज्यू धर्माचं प्रार्थना स्थळ बॉम्बद्वारे उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. अज्ञात ई-मेलद्वारे ही धमकी प्रार्थना स्थळ प्रशासनाला मिळाली आहे.

ठाणे : ठाण्यात ज्यू धर्माचं प्रार्थना स्थळ बॉम्बद्वारे उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. अज्ञात ई-मेलद्वारे ही धमकी प्रार्थना स्थळ प्रशासनाला मिळाली आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून शोध कार्य सुरु केले आहे.

ठाण्यात ज्यू धर्माचं प्रार्थना स्थळ बॉम्बद्वारे उडवण्याची धमकी
अजित पवारांनी वाटप केलेल्या वाहनांची चौकशी करावी; अंबादास दानवेंची मागणी

माहितीनुसार, ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयाजवळ असणाऱ्या ज्यू धर्मियांच्या प्रार्थना स्थळास ईमेलद्वारे उडवण्याची धमकी आली आहे. त्यानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रार्थना स्थळाकडे येणारे सर्वच मार्ग बंद केलेले आहेत. याठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. आणि बॉम्बशोधक व नाशक पथक या तपासणीकरिता दाखल झाले असून शोध कार्य सुरु आहे.

दरम्यान, दोन दिवसांपुर्वीच मुंबईतील रिझर्व्ह बँकेसह एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि 11 ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे देण्यात आली होती. या ई-मेलमध्ये आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. पोलिसांनी या सर्व ठिकाणी शोध घेतला असता काहीही आक्षेपार्ह आढळून आले नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com