Pandharpur
महाराष्ट्र
Pandharpur : चंद्रभागा नदीत तीन महिला बुडाल्या; दोन महिलांचा मृत्यू तर एका महिलेचा शोध सुरू
पंढरपुरमध्ये चंद्रभागेच्या नदी पात्रात बुडून तीन महिला भाविकांचा मृत्यू झाला आहे.
( Pandharpur )पंढरपुरमध्ये चंद्रभागेच्या नदी पात्रात बुडून तीन महिला भाविकांचा मृत्यू झाला आहे. चंद्रभागेच्या पात्रात स्नानासाठी आलेल्या तीन भाविकांचा बुडून मृत्यू झाला असून यात दोन महिलांचा मृत्यू झाला आहे तर एका महिलेचा शोध सुरू आहे.
मृत महिला या जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे. उजनी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे सध्या चंद्रभागा दुथडी भरून वाहत आहे. विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या तीन महिला आज सकाळी चंद्रभागा नदीत स्नानासाठी उतरल्या होत्या.
या महिला भाविकांना पाण्याचा अंदाज आला नसल्याने बुडून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. दोन महिला पाण्यात बुडू लागल्यावर इतर महिलांनी आरडा ओरड केली मात्र पाण्याचा प्रवाह जास्त होता. तिसऱ्या महिलेचा शोध सुरु आहे. घटनास्थळी बचाव पथकही आले आहे.