Maharashtra Winter Session : आज हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस; विविध मुद्द्यांवर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Maharashtra Winter Session) कालपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर या कालावधीत उपराजधानी नागपुरात होणार असून हे अधिवेशन एकाच आठवड्यात गुंडाळलं जाणार आहे.
विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय संघर्ष पेटलेला पाहायला मिळत असून विरोधक सरकारला विविध मुद्द्यांवरुन घेरण्याची शक्यता आहे. आज विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस असून पहिल्या दिवशी विरोधकांनी गोंधळ घातल्यानंतर दुसऱ्या दिवशीही विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.
विरोधकांकडून पुण्यातील पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्यावरून विरोधक सत्ताधाऱ्याना घेरण्याची शक्यता, नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीवरून भाजप विरुद्ध ठाकरे गट, यावरुनही सभागृहात प्रश्न केला जाणार,शेतकऱ्यांच्या कर्जमाफिरवरून ग्रामीण भागातील महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक होण्याची शक्यता असून आजपासून विरोधी पक्ष विविध मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळेल तसेच विरोधक सत्ताधाऱ्यांना अनेक मुद्यांवरुन घेरण्याची शक्यता आहे.
Summery
हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस
पहिल्या दिवशी विरोधकांच्या गोंधळानंतर, दुसऱ्या दिवशीही विविध मुद्द्यांवर चर्चा वादळी होण्याची शक्यता
विरोधक सत्ताधाऱ्यांना अनेक मुद्यांवरुन घेरण्याची शक्यता
