Nagar Parishad and Nagar Panchayat Election : नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी आज मतदान; 264 अध्यक्षपदांचे भवितव्य आज ठरणार
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या 264 अध्यक्षपदांच्या आणि 6 हजार 42 सदस्यपदांच्या जागांसाठी आज मतदान होईल. मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एकूण 12 हजार 316 मतदान केंद्रांसाठी 62 हजार 108 निवडणूक अधिकारी- कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
आज सकाळी 7.30 वाजता मतदानास सुरुवात होईल. सांयकाळी 5.30 पर्यंत मतदानाची वेळ असणार आहे. निवडणुकांसाठी जोरदार तयारी केल्यानंतर काल प्रचाराच्या तोफा थंडावल्या.अखेरच्या दिवशी जोरदार प्रचार करण्यात आला. राज्यातील 264 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान पार पडणार आहे.
यासाठी मतदान यंत्रणा सज्ज झाली आहे. या निवडणुकांच्या प्रचाराची मुदत यावेळी निवडणूक आयोगानं 1 डिसेंबर रोजी रात्री 10.00 वाजेपर्यंत वाढवली होती. राज्य निवडणूक आयोगाने 24 नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी 20 डिसेंबर ही मतदानाची तारीख केली. आता आज मतदान पार पडल्यानंतर उद्या 3 डिसेंबरला मत मोजणी होणार आहे.
सर्वच उमेदवारांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. आज नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या 264 अध्यक्षपदांच्या आणि 6 हजार 42 सदस्यपदांच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार, मतदार कोणाला कौल देणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
Summery
264 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी आज मतदान
नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या 264 अध्यक्षपदांचे भवितव्य आज ठरणार
6 हजार 42 सदस्यपदांच्या जागांसाठी आज मतदान
