Truck Driver Strike : ट्रक चालकांच्या संपाचा आज दुसरा दिवस

Truck Driver Strike : ट्रक चालकांच्या संपाचा आज दुसरा दिवस

ट्रक चालकांच्या संपाचा आज दुसरा दिवस आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

ट्रक चालकांच्या संपाचा आज दुसरा दिवस आहे. ट्रकमुळे एखादा व्यक्ती जखमी झाल्यास त्याला तात्काळ रुग्णालयात नेले पाहिजे, तसे न केल्यास आणि ट्रकचालक दोषी आढळून आल्यास त्याला सात वर्षांची शिक्षा आणि सात लाख रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रान्सपोर्ट युनियनच्यावतीनं संप पुकारण्यात आला आहे.

महाराष्ट्रासह अनेक राज्यात ट्रकचालकांनी बंद पुकारला आहे. या संपाचा वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली आहे. मोटार वाहन कायद्याला बस-ट्रक चालकांकडून तीव्र विरोध करण्यात येत आहे.

अनेक ठिकाणी ट्रक चालकांनी आपली वाहनं रस्त्यांवर उभी करुन रस्ता अडवला आहे. ट्रकचालकांचा संपाचा परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यावरही झालेला पाहायला मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com