धक्कादायक! लहान मुलीच्या तोंडात बोळा कोंबून  दोन चोरट्यांनी घरात शिरून केली चोरी

धक्कादायक! लहान मुलीच्या तोंडात बोळा कोंबून दोन चोरट्यांनी घरात शिरून केली चोरी

येथून धक्कादायक बातमी समोर येत आहे. लहान मुलीचे हात बांधून तोंडात कापडाचा बोळा कोंबून भर दिवसा दोन चोरट्याने घरात शिरून चोरी केली आहे

डोंबिवली : येथून धक्कादायक बातमी समोर येत आहे. लहान मुलीचे हात बांधून तोंडात कापडाचा बोळा कोंबून भर दिवसा दोन चोरट्याने घरात शिरून चोरी केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकट खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू केला आहे.

धक्कादायक! लहान मुलीच्या तोंडात बोळा कोंबून  दोन चोरट्यांनी घरात शिरून केली चोरी
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून तानाजी सावंत पत्रकारांवर भडकले

माहितीनुसार, डोंबिवली मधील नांदिवली टेकडी परिसरात डॉ. सदानंद सिंह हे राहत असून रविवारी संध्याकाळी 6 ते 7 वाजेच्या दरम्यान ते आपल्या क्लिनिकमध्ये गेले. याच वेळी त्यांची पत्नी आपल्या 8 वर्षीय मुलीला घरात सोडून सेफ्टीडोर न लावता शेजाऱ्यांकडे काही कामानिमित्त गेल्या. याचाच फायदा घेत दोन चोरट्यांनी घरात प्रवेश मिळवली आणि मुलीचे हात बांधून तोंडात कापडाचा बोळा कोंबला.

बेडरूममधील कपाटात ठेवलेली चाळीस हजार रोख रक्कम आणि देवघराच्या ड्रॉव्हरमधील सोन्याचे मंगळसूत्र असे एक लाख 90 हजाराचा मुद्देमाल चोरी करून पसार झाले. याप्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे संशयित चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com