Uday Samant : शरद पवार यांची भेट का घेतली? उदय सामंत यांनी सांगितले कारण...
थोडक्यात
उदय सामंत यांनी शरद पवार यांची भेट घेतली
शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर उदय सामंत यांची प्रतिक्रिया
'आजच्या भेटीमागे कोणतेही राजकीय कारण नाही'
(Uday Samant) उदय सामंत यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांच्या भेटीनंतर उदय सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला. उदय सामंत म्हणाले की, 'मी पवार साहेबांच्या भेटीला येतो तेव्हा कोणतेही राजकीय कारण नसतं. मी शरद पवार यांच्यासोबत काही संस्थांवर काम करतो. तसं क्रिडा क्षेत्रामध्ये काम करतो. त्याबद्दल काही गोष्टी जेव्हा साहेबांना सांगायच्या असतात तेव्हा त्यांची भेट घेतो.
त्याच्यामुळे आजच्या भेटीमागे कोणतेही राजकीय कारण नव्हते. 5 मिनिटं चर्चा झाली आणि मी निघालो. प्रत्येक भेट ही राजकीयच असते अशातला भाग नाही. स्थानिक स्वराज्य संस्था जवळ आलेल्या आहेत. त्यामुळे आमची भेट स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी आहे का अशी एक शंका निर्माण होऊ शकते. परंतु याला कुठेही राजकीय स्पर्श नव्हता.' असे उदय सामंत म्हणाले.
