दावोसच्या टीकेवरुन उदय सामंत यांनी दिली प्रतिक्रिया म्हणाले...

दावोसच्या टीकेवरुन उदय सामंत यांनी दिली प्रतिक्रिया म्हणाले...

सहकार आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत आज रविवार, १५ ऑक्टोबर रोजी मुंबईत 'लोकशाही सहकार उद्योग संवाद' या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

सहकार आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत आज रविवार, १५ ऑक्टोबर रोजी मुंबईत 'लोकशाही सहकार उद्योग संवाद' या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात उद्योग व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची मुलाखत घेतली.

यावेळी बोलताना उदय सामंत म्हणाले की, आमचा सक्सेस रेट चांगला आहे. महाराष्ट्र नंबर 1ला आहे. राज्यामध्ये सक्षम सरकार आहे. मागचे 3 वर्ष कर्नाटक, गुजरात होते. आता महाराष्ट्र आहे. MOU झालेत पण महाराष्ट्राचा सक्सेस रेट 80 टक्के आहे. महाराष्ट्र हीच उद्योगनगरी आहे.

यासोबतच उदय सामंत पुढे म्हणाले की, गुजरातचा कार्यक्रम वेगळा आणि मॅग्नेटिक महाराष्ट्र हा कार्यक्रम वेगळा आहे. महाराष्ट ही उद्योग नगरी आहे. हे गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी सिद्ध केले आहे. नंदुरबारमध्ये सुद्धा एक गुजरातचा प्रकल्प आहे. तो सुद्धा आम्ही वाढवणार आहोत सिनार्म्स नावाचा प्रकल्प आहे तो प्रकल्प ठेवण्यासाठी शरद पवारांनी सुद्धा प्रयत्न केला. शिंदे सरकार आल्यावर आम्ही 48 दिवसांत सब कमिटी केली आणि आम्ही 20 हजार कोटींचा प्रकल्प वाचवला.Airbus हा प्रकल्प महाराष्ट्र्रात यावा यासाठी तत्कालीन उद्योगमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी प्रयत्न नाही केले तर विरोधी पक्षनेते दिल्लीला गेले आणि बोलणी केली त्यानंतर ते महाराष्ट्रात आले आणि उद्योगमंत्र्यांना सांगितले आता तुम्ही प्रयत्न करा पण कुठेही पत्रं गेलं नाही. असे उदय सामंत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com