Uddhav Thackeray | करून दाखवलं , देशात नंबर 1 मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच!

Uddhav Thackeray | करून दाखवलं , देशात नंबर 1 मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच!

Published by :

कोरोनाच्या संकटातही गेले दीड वर्ष राज्याचा गाडा सक्षमपणे हाकणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देशातील नागरिकांनी पुन्हा एकदा आपली पसंती दर्शविली आहे. 'प्रश्नम' या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात पुन्हा एकदा यावर शिक्कामोर्तब झाले असून देशाची 67 टक्के लोकसंख्या असलेल्या 13 राज्यांतील सर्वेक्षणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच सर्वाधिक सक्षम असल्याचे सिद्ध झाले आहे.

जनतेने दिलेल्या कलानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच देशात नंबर वन ठरले असून त्यापाठोपाठ दुसऱ्या स्थानी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, तर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे तिसऱ्या स्थानी आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com