Pandharpur : आज विठ्ठल रखुमाईचा शाही विवाह सोहळा

Pandharpur : आज विठ्ठल रखुमाईचा शाही विवाह सोहळा

आज पंढरपुरात वसंत पंचमी दिवशी विठ्ठल रखुमाईचा शाही विवाह सोहळा पार पडणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

आज पंढरपुरात वसंत पंचमी दिवशी विठ्ठल रखुमाईचा शाही विवाह सोहळा पार पडणार आहे. यासाठी मंदिराला विविध प्रकारच्या रंगबिरंगी फुलांनी सजविण्यात आले आहे. भक्तांच्या उपस्थिती मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.

शेकडो भाविकांच्या उपस्थितीत बारा वाजता हा विवाह सोहळा पार पडणार आहे. विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या उत्सव मूर्ती विठ्ठल सभा मंडपात अर्थात लग्नाच्या मांडवात आणण्यात येतील. विठुराया आणि रुक्मिणीमातेसाठी पांढरा शुभ्र पोशाख तयार करण्यात आला आहे.

विठ्ठल रुक्मिणीची पारंपारिक पद्धतीने षोडशोपचारे पूजा करण्यात आली. या विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या शाही विवाह सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com