भारतीय बनावटीच्या कोव्हॅक्सिनला WHO कडून मान्यता कधी?

भारतीय बनावटीच्या कोव्हॅक्सिनला WHO कडून मान्यता कधी?

Published by :

भारत बायोटेक या जैविक कंपनीची कोव्हॅक्सिन लसीला अजुनही जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मान्यता दिलेली नाही.

डब्लूएचओने मान्याता दिलेल्या लसींने लसीकरण झालेल्या प्रवाशांना परदेशात जाण्याती परवानगी असते आणि त्यांना क्वारेंटाईन करण्याची सक्ती नसते. हजारोलाखो नागरीकांनी कोव्हॅक्सिनची लस घेतलेली आहे. परंतु जागतिक आरोग्य संघटनेने या लसीला मान्यता दिलेली नसल्यामुळे या नागरीकांचे परदेश प्रवास रखडले आहेत.
भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही भारताने बनवलेली पहिली कोरोनाविराधी स्वदेशी लस आहे.

ब्रिटनच्या अॅस्ट्राझेन्का या लसीची भारतात उत्पादन झालेली लस म्हणजे कोव्हीशील्ड. WHOने कोव्हीशील्डला मान्यता दिलेली आहे.

WHOने मान्यता दिलेली नसन्यामुळे युरोपियन युनियन आणि अमेरीकाने कोव्हॅक्सिनने लसीकरण झालेल्या प्रवाशांना त्यांच्या देशात परवानगी दिलेली नाही.

डब्लूएचओने कोव्हॅक्सिन लसीचे आणखी तपशील मागवले आहेत. ही माहिती मिळताच २४ तासांत WHO कडून निर्णय घेण्यात येईल अशी माहिती मिळाली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com