‘आपल्याच वहिनीवर अ‍ॅसिड फेकायला कोणी सांगितलं होतं?’ नारायण राणेंच्या वक्तव्याने खळबळ

‘आपल्याच वहिनीवर अ‍ॅसिड फेकायला कोणी सांगितलं होतं?’ नारायण राणेंच्या वक्तव्याने खळबळ

Published by :

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटक आणि सुटके प्रकरणानंतर नारायण राणेंच्या (Narayan Rane) जन आशीर्वाद यात्रेला पुन्हा एकदा सुरुवात झाली. यावेळी नारायण राणे यांनी केलेय वक्तव्याने एकच खळबळ उडवून दिली.काही जुन्या प्रकरणांना हात घालत गंभीर आरोप केले. यावेळी त्यांनी एका अ‍ॅसिड प्रकरणाचा दाखला देत खळबळ उडवून दिली. नाव न घेता नारायण राणे यांनी हा आरोप केल्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा या प्रकरणाची चर्चा रंगू लागली आहे.

'आपल्या बंधूच्या पत्नीवर म्हणजे वहिनीवर अ‍ॅसिड फेकायला कुणी सांगितलं पोराला. काय संस्कार? आपल्याच भावाच्या पत्नीवर अ‍ॅसिड फेकलं. ही प्रकरणं मी टप्प्याटप्प्याने काढणार. सुशांतची केस संपली नाही आहे. दिशा सालियान प्रकरण अजूनही बाकी आहे. आम्ही भारतीय नागरिक आहोत. तुम्हाला जो कायदा तो आम्हालाही आहे. दादागिरी करू नका. तो तुमचा पिंड आहे. तुम्ही आम्हाला अनुभवलं आहे. आमच्या वाटेला जाऊ नका.

'विधायक विकासाची काम आम्हाला करायची आहेत. आम्हाला घरात बसून कारभार नाही करायचा. धमक्या नारायण राणेंना नका देऊ. माझ्याकडे पुष्कळ मसाला आहे. राजकारणात मी ३९ वर्षे होतो सोबत. जवळून सर्व माहिती आहे. त्यामुळे आमच्या वाटेला येऊ नये.', असा इशाराही त्यांनी दिला.

नारायण राणेंनी १९ ऑगस्टला मुंबईतून जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली होती. या यात्रेचा समारोप सिंधुदुर्गमध्ये होणार आहे. रायगडमध्ये नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कानाखाली लावण्याचं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याने शिवसेना-भाजपा आमने-सामने आले आणि राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com