Sharad Pawar : माळेगाव नगरपंचायतीच्या मतदानाला शरद पवार येणार का ?
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Sharad Pawar ) नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या 264 अध्यक्षपदांच्या आणि 6 हजार 42 सदस्यपदांच्या जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. आज मतदान पार पडल्यानंतर उद्या 3 डिसेंबरला मत मोजणी होणार असून मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
आज नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या 264 अध्यक्षपदांच्या आणि 6 हजार 42 सदस्यपदांच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार, मतदार कोणाला कौल देणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता माळेगाव नगरपंचायतीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे.
सकाळी आठ वाजल्यापासून नागरिकांनी मतदानासाठी एकच गर्दी केली असून 17 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्षपदासाठी मतदान होत आहे. माळेगाव मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाने युती केली असून त्यांची थेट लढत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटासोबत पाहायला मिळणार असून महत्त्वाचे म्हणजे शरद पवारांचे माळेगाव नगरपंचायतीसाठी मतदान असताना शरद पवार या मतदानाला उपस्थित राहणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
Summery
माळेगाव नगरपंचायतीच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात
सकाळी आठ वाजल्यापासून नागरिकांनी मतदानासाठी गर्दी
माळेगाव नगरपंचायतीच्या मतदानाला शरद पवार येणार का ?
