Breaking News : मुंबईच्या महापौर पदाचा निर्णय दिल्लीमध्ये होणार? आज महाराष्ट्रातील शिवसेनेचे प्रमुख नेते दुपारनंतर दिल्लीमध्ये जाणार
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Breaking News) मुंबई महानगर पालिका निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.29 महानगरपालिकांमध्ये भाजपा-शिवसेनेच्या महायुतीने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत.महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि आता महापौर कुणाचा बसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याच पार्श्वभूमीवर आता मुंबईच्या महापौर पदाचा निर्णय दिल्लीमध्ये होणार असल्याची माहिती मिळत असून आज महाराष्ट्रातील शिवसेनेचे प्रमुख नेते दुपारनंतर दिल्लीमध्ये जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
संध्याकाळी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे शिवसेनेचे सरचिटणीस राहुल शेवाळे आणि भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्यात बैठक होणार असून मुंबईतील महापौरपद स्थायी समिती अध्यक्ष आणि इतर समित्यांबाबतही प्राथमिक चर्चा होणार असल्याची माहिती आहे. पालिकेमध्ये सन्मानपूर्वक पदे मिळावी अशी भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांची भूमिका असल्याचे समजते.
Summary
मुंबईच्या महापौर पदाचा निर्णय दिल्लीमध्ये होणार
आज महाराष्ट्रातील शिवसेनेचे प्रमुख नेते दुपारनंतर दिल्लीमध्ये जाणार
शिवसेनेचे सरचिटणीस राहुल शेवाळे आणि भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्यात होणार बैठक
