वरळीत लिफ्ट कोसळून चौघांचा  मृत्यू

वरळीत लिफ्ट कोसळून चौघांचा मृत्यू

Published by :

वरळीच्या हनुमान गल्लीत लिफ्ट कोसळून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ललित अंबिका या इमारतीमधील बिल्डिंगमध्ये लिफ्ट कोसळल्याने झालेल्या घटनेत अनेक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या इमारतीच्या लिफ्टमध्ये एकुण सहा जण होते. लिफ्ट कोसळल्याची घटना घडल्यानंतर एकुण 4 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याची माहिती आहे. वरळीतील एन एन जोशी हद्दीत सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेतील आकडा आणखी वाढण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याठिकाणी बांधकाम तसेच दुरूस्तीचे काम सुरू असताना ही घटना घडल्याची माहिती कळते आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com