Pune
पुणे
Pune : पुण्यातील सदाशिव पेठेतील रमेश डायिंग दुकानाला भीषण आग
पुण्यातील सदाशिव पेठेतील रमेश डायिंग दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Pune) पुण्यातील सदाशिव पेठेतील रमेश डायिंग दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. टेरेस आणि दुकानात आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
ही आग नेमकी कशी लागली याची माहिती अजून मिळालेली नाही आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे मात्र दुकानातील सामानाचे मोठे नुकसान झाले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
अग्निशमन दलाच्य सात ते आठ वाहनांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असून आग मोठी असल्यामुळे संपूर्ण परिसरात धुर पसरला आहे.
Summery
पुण्यातील सदाशिव पेठेत असलेल्या रमेश डायिंग दुकानाला आग
टेरेस आणि दुकानात आग लागल्याची प्राथमिक माहिती
पुणे अग्निशमन दलाचे ५ गाड्या घटनास्थळी दाखल
