Pune : भोर नगरपरिषदेच्या मतदान केंद्रावरील धक्कादायक प्रकार; मतदानावेळी EVMची हळद-कुंकवाने पुजा
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Pune) नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या 264 अध्यक्षपदांच्या आणि 6 हजार 42 सदस्यपदांच्या जागांसाठी आज मतदान होईल. मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आज मतदान पार पडल्यानंतर उद्या 3 डिसेंबरला मत मोजणी होणार आहे.
आज नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या 264 अध्यक्षपदांच्या आणि 6 हजार 42 सदस्यपदांच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार, मतदार कोणाला कौल देणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. यातच आता काही मतदान केंद्रावर गोंधळाची परिस्थिती निर्माण होताना पाहायला मिळत आहे.
यातच भोर नगरपरिषदेच्या मतदान केंद्रावरील धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. भोरमधील मतदानावेळी निवडणूक आयोगाच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आले असून मतदानावेळी EVMची हळद-कुंकवाने पुजा करण्यात आल्याचे पाहायला मिळत असून त्याचबरोबर EVMची पुजा करत आरती देखील केल्याचा प्रकार समोर आला आहे.
Summery
भोरमधे मतदानावेळी निवडणूक आयोगाच्या नियमांचं उल्लंघन
भोरमधे मतदानावेळी EVMची हळद-कुंकवाने पुजा
भोरमध्ये EVMची पुजा करत केली आरती
