Mumbai Local Megablock : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, मध्य आणि हार्बर लोकल मार्गावर मेगाब्लॉक
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Mumbai Local Megablock) मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी असून महत्त्वाचे काम असेल तर रेल्वेचे वेळापत्रक बघून घराबाहेर पडा. मध्य आणि हार्बर लोकल मार्गावर उद्या मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यासोबतच ट्रान्स हार्बर मार्गावर पनवेल ते ठाण्याकडे दरम्यानच्या सेवा रद्द राहणार आहेत.
हार्बर मार्गावर पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान पोर्टमार्ग वगळून अप आणि डाउन मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 पर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि विद्याविहार दरम्यान रविवारी सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 यादरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर मार्गावर लोकल धावतील. कालावधीत सीएसएमटी ते बेलापूर/पनवेल दरम्यानच्या हार्बर मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे.
Summery
रविवारी महत्वाचे काम असेल तर लोकलचे वेळापत्रक बघून प्रवास करा
मध्य आणि हार्बर लोकल मार्गावर मेगाब्लॉक घेणार
सीएसएमटी ते बेलापूर/पनवेल दरम्यानच्या हार्बर मार्गावरील वाहतूक बंद राहणार
