MNS- MVA Mumbai Morcha : 'सत्याचा मोर्चा'च्या आयोजकांवर गुन्हा दाखल
थोडक्यात
'सत्याचा मोर्चा'च्या आयोजकांवर गुन्हा दाखल
मविआ आणि मनसेच्या मोर्चाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल
प्रतिबंधात्मक आदेशांचं उल्लंघन केल्याने गुन्हा
(MNS- MVA Mumbai Morcha) निवडणूक आयोग आणि मतदान प्रक्रियेतील घोळाविरोधात विरोधकांनी काल महाएल्गार पुकारला . महाविकास आघाडी आणि मनसे यांच्याकडूनकाल सत्याचा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. फॅशन स्ट्रीट ते मुंबई महापालिकेपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चा राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह आघाडीचे अनेक मोठे नेते सहभागी झाले होते.या मोर्चातून उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि शरद पवार यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर अनेक आरोप केले आहेत. मुंबईत निवडणूक आयोगाच्या विरोधात महाविकास आघाडी आणि मनसेने काढलेल्या 'सत्याचा मोर्चा'मुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळाले.
मोर्चात हजारो समर्थक सामील झाले होते. या महाविकास आघाडी आणि मनसेच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिलेली नव्हती. याच पार्श्वभूमीवर आता 'सत्याचा मोर्चा'च्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मविआ आणि मनसेच्या मोर्चाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्याबद्दल आणि बेकायदेशीर सभा आयोजित केल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
पोलीस अधिकाऱ्यांच्या मते, आयोजकांनी मिरवणूक काढण्यासाठी आवश्यक असलेली परवानगी घेतली नव्हती, त्यामुळे पोलिसांनी आयोजकांवर बेकायदेशीर सभा आणि अधिकृत आदेशांचे उल्लंघन या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
