संभाजीराजे यांची प्रकृती बिघडली, डॉक्टरांचा सल्ला ऐकण्यास राजेंचा नकार
मराठा आरक्षणासह (Maratha Reservation) विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषणास बसलेले छत्रपती संभाजी राजे (Sambhaji Raje Chatrapati) यांची प्रकृती आज तब्येत बिघडली आहे. डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला आहे. संभाजीराजे यांच्या प्रकृतीची तपासल्यानंतर डॉक्टरांनी ही माहिती दिली आहे. मात्र, संभाजीराजे उपोषणावर ठाम आहेत. हा भावीपिढीच्या उज्वल भविष्यासाठीचा लढा असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
दुसरीकडे शासकीय पातळीवर हालचाली वाढल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर राजे यांच्या उपोषणाबद्दल बैठक सुरू झाली आहे. या बैठकीसाठी राजे यांच्या वतीने एक शिष्टमंडळ उपस्थित आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीत काय निर्णय होणार, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. मात्र, राजेंनी आता निर्वाणीचा इशारा दिल्यामुळे डॉक्टरांसह सारेच चिंतेत आहेत.