कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मायक्रो लॉकडाऊन आवश्यक
गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अशा परिस्थितीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मायक्रो लॉकडाऊनची आवश्यकता असल्याचं मत एम्सचे प्रमुख आणि कोविड टास्कफोर्सचे महत्त्वाचे सदस्य डॉ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केलं. देशात कोरोनाबाधितांची वाढत्या संख्येला आळा घालणं आणि सुरक्षेच्या सूचनांचं पालन करण्यासाठी नव्या रणनितीची आवश्यकता आहे. जेणेकरून कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर नियंत्रण मिळवता येईल, असा सल्ला त्यांनी दिला.
"देशात कम्युनिटी ट्रान्समिशन होण्याची शक्यता आहे. तसंच जोपर्यंत यावर नियंत्रण मिळवलं जात नाही तोपर्यंत आरोग्य व्यवस्थेवर ताण कायम राहिल. यासाठी मायक्रो लॉकडाऊन हा एक पर्याय आहे, जो कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यापासून मदत करू शकतो. आपल्याला जलदगतीनं रोज वाढणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या कमी करावी लागेल. यामध्ये कन्टेन्मेंट झोन, लॉकडाऊन एरिया, चाचण्यांची संख्या, ट्रेसिंग आणि आयसोलेशन अशा पर्यायांचा वापर केला पाहिजे," असं गुलेरिया म्हणाले.