खासदार नवनीत राणा यांनी आदिवासी नृत्य करून केली धुळवड साजरी
खासदार नवनीत राणा यांनी आदिवासी नृत्य करून केली धुळवड साजरी

Video | खासदार नवनीत राणा यांनी आदिवासी नृत्य करून केली होळी साजरी

Published by :
Shweta Chavan-Zagade
Published on

सुरज दाहाट,अमरावती | राज्यभरात होळी (holi 2022) उत्साह बघायला मिळाला. तरुणांसह बच्चे कंपनीनं रंगाची उधळण करत धमाल केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं काळजी घेण्याचं आवाहन आहे. यातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी मेळघाटातील आदिवासींसोबत होळी साजरी केली.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा हे दांपत्य दरवर्षी अमरावती जिल्ह्यातील आदिवासी बहुल मेळघाटात होळी साजरी करतात .खासदार नवनीत राणा यांनी गुरूवारी (18 मार्च) रात्री आदिवासी बांधवां सोबत आदिवासी नृत्य करत ठेका धरला. होळी हा सण आदिवासी बांधवांसाठी सर्वात मोठा उत्सव आहे.

नवनीत राणा यांनी आदिवासींचं प्रसिद्ध कोरकू नृत्य केलं. होळीला आदिवासी बांधवांचे पारंपरिक वाद्य बासरी,ढोलकीच्या तालावर खासदार नवनीत राणा यांनी नृत्य करत सर्वांच लक्ष वेधून घेतलंय.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com