‘सरकार आम्हाला घरीच स्थानबद्ध करण्याच्या तयारीत’; राम कदम यांचा आरोप

‘सरकार आम्हाला घरीच स्थानबद्ध करण्याच्या तयारीत’; राम कदम यांचा आरोप

Published by :
Published on

मुंबई: कोरोना काळात गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने सूचना दिल्या असल्या तरी दहीहंडी साजरी करण्याबाबत भाजपा आणि मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी उत्सव साजरा करण्यास राज्य सरकारने परवानगी नाकारल्यानंतरही मंगळवारी पारंपरिक पद्धतीने दहीहंडी साजरी करण्याच्या भूमिकेवर भाजप ठाम आहे.

'आम्हाला कोणतेही थर रचायचे नाहीत. कोणतीही गर्दी न करता पारंपरिक पद्धतीने आम्हला दहीहंडी साजरी करायची परवानगी हवी आहे, ती आम्ही मागत आहोत. आम्ही पारंपरिक दहीहंडी साजरी करणार. हे जुलमी ठाकरे सरकार हिंदू सणांना परवानगी देण्याऐवजी आम्हाला पोलिसांद्वारे नोटीस देत आहे. आम्ही दहीहंडी करणारच हा आमचा निर्धार आहे. उद्या पारंपारिक वेषभूषा करून राधा आणि कृष्ण घाटकोपर पोलीस स्टेशनवर दहीहंडी घेऊन पोचणार. पारंपरिक पद्धतीने दहीहंडी करणारच हा आमचा निर्धार आहे', असे भाजप नेते राम कदम यांनी म्हटलं आहे.

तसेच 'आम्ही घाटकोपर पोलीस ठाण्यामध्ये पारंपारिक दहीहंडी साजरी करण्यासंदर्भात निघत आहोत. मात्र आम्हाला घरीच स्थानबद्ध करण्याची तयारी सरकार करत आहे. काहीही झाले तरी दहीहंडी होणारच', असा निर्धार राम कदम ह्यांनी केला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com