Nana Patole: मोदी शाहांनी महाराष्ट्राला एटीएम बनवून ठेवलंय, पटोलेंची मोदी शाहांवर घणाघाती टीका

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची मोदी-शाहांवर घणाघाती टीका केली आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाहांनी महाराष्ट्राला एटीएम बनवून ठेवला आहे असं नाना पटोले म्हणाले आहेत.
Published by :
Team Lokshahi

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची मोदी-शाहांवर घणाघाती टीका केली आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाहांनी महाराष्ट्राला एटीएम बनवून ठेवला आहे असं नाना पटोले म्हणाले आहेत. महाराष्ट्राला किती लुटलं हे मोदी- शाहांनी सांगावं असं देखील नाना पटोले म्हणाले आहेत. भाजपला मनुस्मृती आणायची आहे आणि लोकशाही व्यवस्था संपवायची आहे.

मोदी, शहाणी आपली कहाणी सांगावी, दुसऱ्यावर बोट दाखवण्यापेक्षा स्वतःकडे चार बोट आहे हे पण लक्षात ठेवा. तसचं पुढे नाना पटोले म्हणाले, मला त्यांनाच विचारायचं आहे की त्यांनी महाराष्ट्रातून किती पैसे लुटले? तुम्ही छत्तीसगड, मध्यप्रदेश, गुजरातला तर लुटतच आहे आणि आता महाराष्ट्राला लुटून गुजरातला देत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com