Bollywood New Faces 2024: 2024मध्ये चित्रपटसृष्टीत नवे चेहरे झळकले, पाहा कोण आहेत 'हे' नवोदित कलाकार

Bollywood New Faces 2024: 2024मध्ये चित्रपटसृष्टीत नवे चेहरे झळकले, पाहा कोण आहेत 'हे' नवोदित कलाकार

2024 हे वर्ष चित्रपटसृष्टीसाठी अनोख ठरले आहे. नव्या चेहऱ्यांनी मोठ्या पडद्यावर झळकून प्रेक्षकांची मने जिंकली जाणून घ्या यांची कामगिरी
Published by :
Team Lokshahi
Published on

2024 हे वर्ष अंतिम टप्प्यात आलं आहे. हे वर्ष अविश्वसनीय तर ठरलंच आहे पण या वर्षात अनेक गोष्टी घडून गेल्या. 2024 हे वर्ष चित्रपटसृष्टीसाठी अनोख ठरल आहे, कारण या वर्षात 100 हून अधीक चित्रपटांची निर्मिती झाली आहे. तसेच यावेळी काही नव्या चेहऱ्यांना चित्रपटसृष्टीत पदार्पण करून त्यांना मोठ्या पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली आहे. यात काही स्टारकिड्स आहेत तर काही बाहेरचे आणि या नवोदित कलाकारांच्या चित्रपटाने ऑस्करच्या शर्यतीत प्रवेश केला आहे.

यामध्ये पहिलं नाव आहे अभय वर्मा, अभय वर्मा हा याआधी अनेक जाहिरातींमध्ये पाहायला मिळाला आहे. पण याचं पदार्पण हे 'मुंज्या' या चित्रपटाने झालं. 'मुंज्या' या चित्रपटात त्याच्यासोबतीला शर्वरी वाघ आणि मोना सिंग या देखील पाहायला मिळाल्या. 'मुंज्या' हा चित्रपट हॉरकॉम असून या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक करत बजेटच्या चौपट कमाई केली. अभय वर्मा याचा चाहतावर्ग देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो आहे.

यानंतर प्रतिभा रंटा ही 'हीरामंडी' या वेबसिरिजसह 'लाप्ता लेडीज'मधील जयाच्या भूमिकेने तिला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धि मिळाली. भारतातून 'लाप्ता लेडीज' ऑस्करसाठी हा चित्रपट पाठवण्यात आला होता. याशिवाय ती वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये काम करताना दिसणार आहे. तिचा देखील चाहता वर्ग हा मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे.

नितांशी गोयल दीर्घकाळापासून इंडस्ट्रीत कार्यरत आहेत. पण 'लपता लेडीज'मधील फुलच्या व्यक्तिरेखेने तिला वेगळीच ओळख मिळाली. ज्यामुळे 2024मध्ये तिचा कमबॅक झाला असं म्हणायला हरकत नाही. हा चित्रपट यावर्षी ऑस्करसाठी भारतातून अधिकृतरीत्या पाठवण्यात आला होता. मात्र, तो आता या शर्यतीतून बाहेर पडला आहे.

आमिर खानचा मुलगा जुनैद खान हा पण आता एक दमदार अभिनेता म्हणून ओळखला जात आहे. 'महाराज' चित्रपटातून त्यांनी करिअरला सुरुवात केली. सध्या तो 'लव्ह टुडे'च्या रिमेकमध्ये काम करत आहे. हा त्याचा पहिला थिएटरमध्ये रिलीज होणारा चित्रपट असेल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com