New Year Rules | गर्दी करणाऱ्यांवर कठोर कारवाई : दिलीप वळसे पाटील
कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. यातच आता ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे. नव्या वर्षाची चाहूल लागली असून त्याच्या स्वागतासाठी तरुणाई सज्ज झाली आहे. मात्र त्यांच्या जल्लोषावर कोरोनाचे सावट आहे.
सध्या कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी येऊन पार्टी करु नये असे आवाहान राज्य सरकारकरडून केले जात आहे. तर दुसरीकडे कोरोना प्रतिबंधक नियमांची पायमल्ली करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाणार आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले की, "ज्यांना पार्टी करायची आहे त्यांना पूर्ण वर्ष आहे. मात्र सध्या कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन कुटुंबीयांसोबत नव्या वर्षाचे स्वागत करा. पोलिसांना आम्ही काही सूचना दिल्या आहेत. जे लोक रस्त्यावर येतील त्यांच्याविरोधात कठोर करावाई करण्याचे सांगण्यात आले आहे. मात्र कारवाई करण्यापेक्षा कोरोना नियमांचे पालन करुन गर्दी करु नये,

